शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

ग्रामीण भागात स्वयंशिस्तीचे ग्रामस्थांकडून प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:31 PM

गोरगरीब, मजुरांचे कामधंदे बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर व्यक्तिंकडून अन्नधान्य व किराणा मालाचे वाटपही केले जात आहे.

ठळक मुद्देएक मीटर अंतरावर सफेद रंगाने चौकोन तयार करून त्यातच उभे राहून खरेदी करण्याच्या सूचना प्रत्येक दुकानाबाहेर चौकट आखून देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउनाला नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली जात असली तरी, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेत सोशल डिस्टन पाळले जात आहे. गोरगरीब, मजुरांचे कामधंदे बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर व्यक्तिंकडून अन्नधान्य व किराणा मालाचे वाटपही केले जात आहे.

मातोरीत लक्ष्मणरेषामातोरी : तालुक्यातील मुंगसरे, मातोरी, मखमलाबाद गावातील दुकानदारांनी वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी लक्ष्मणरेषा आखून दिल्या असून, त्याचे पालन करणाऱ्यांनाच वस्तूंचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची दुकानावर होणारी गर्दी व त्यातून वाढणारा संसर्ग पाहता मेडिकल, किराणा, दूध डेअरी, कीटकनाशक दुकानदारांनी एकत्रित निर्णय घेतला. त्यासाठी दुकानासमोर सुरक्षित अंतराच्या गोलाची निर्मिती केली व या गोलाकार अंतराच्या वर्तुळात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.-----विल्होळीत चौकट आखलीविल्होळी : शहरालगतच असलेल्या विल्होळी गावात औद्योगिक वसाहत, रहिवासी वसाहतीत खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी पाहता ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक दुकानाबाहेर चौकट आखून देण्यात आली असून, कोणत्याही ग्राहकाने चौकट न ओलांडण्याचे व गर्दी करण्याचे आवाहन सरपंच बाजीराव गायकवाड यांनी केले आहे. गावातील प्रत्येक किराणा दुकान, भाजीपाला, औषधालय, बँक, एटीएम या ठिकाणी एक मीटर अंतरावर सफेद रंगाने चौकोन तयार करून त्यातच उभे राहून खरेदी करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. तसेच गावातील कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार बाहेर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक