शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली

By श्याम बागुल | Published: May 14, 2021 1:32 AM

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा  ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.    

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे प्रयत्न : पाॅझिटिव्हिटी दरातही मोठी घट

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा  ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.    विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेले नाशिक, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड व देवळा या तालुक्यांमध्येदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असून, निफाड व नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र, अजूनही कोरोना ठाण मांडून बसला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. विशेष करून नाशिक  शहराशी व्यापार, व्यवसाय व नोकरी धंद्यानिमित्त संबंध येणाऱ्या लगतच्या सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याबरोबरच सोयी, सुविधांचीही वाणवा जाणवली. नाशिक शहरात बेड कमी पडू लागल्याने ग्रामीणचे रुग्ण दाखल करण्यासाठी वणवण भटकावे लागले. त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गावांनीही पुढाकार घेत स्वयंस्फूर्तीने गावे बंद  ठेवली. तसेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलविले. याचा सर्व एकत्रित परिणाम गेल्या काही दिवसांत जाणवू लागला असून, त्यातूनच १ मेच्या तुलनेत १३ मे रोजी रुग्णांची संख्या जवळपास ५३८० ने कमी झाली आहे.नऊ टक्क्यांनी दर घसरला१ मे रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६३७७ रुग्ण  होते. त्यावेळी  करण्यात आलेल्या एका दिवसाच्या ५२०६ संशयित रुग्णांच्या चाचणीत कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण १५०३ म्हणजेच पॉझिटिव्हीटी दर २८.८७ इतका होता. गेल्या बारा दिवसांत हेच प्रमाण आता कमी झाले असून, १३ मे रोजी जिल्ह्यात १०,९९७ इतके रुग्ण असून, ५५६७ संशयित रुग्णांच्या तपासणीतून १०९७ रुग्ण बाधित सापडले आहेत, पॉझिटिव्हीटी दर १९.७१ इतक्या खाली आला आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या