राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले आबालवृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:09 IST2018-10-31T13:09:25+5:302018-10-31T13:09:35+5:30
पेठ -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून पेठ पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले आबालवृद्ध
पेठ -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून पेठ पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील अबालवृद्धसह सामान्य जनतेच्या सहभागाने सामाजिक एकोपा जपण्यात आला. दादासाहेब बिडकर महाविद्यालयाच्या प्रागंणातून तहसीलदार हरिष भामरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडचा प्रारंभ करण्यात आला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, पालक, खेळाडू यासह शासकिय कर्मचारी व अधिकारी यांनी पाच किमी दौडमध्ये सहभाग नोंदवला.बलसाड रोड, तोंडवळ फाटा, बाजारपेठ, जूना बसस्टँड मार्गे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर समारोप करण्यात आला. सर्व सहभागीना प्रशस्तीपत्रके प्रदान करून गौरवण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, उपनिरिक्षक भरसट, जगदिश शिरसाठ, राजेश पाटील, कांतीलाल राऊत, याकूब शेख, जाकीर मनियार, नाना ठाकूर, जयंत महमाने, सुरेंद्र गाडगीळ, सुनिल धोंडगे, मोहमद शेख, क्रि डा संचालक चंद्रशेखर पठाडे, पोलीस नाईक किरण बैरागी, दिलीप रेहरे यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.