अफवांचे ‘स्फोट’महात्मा गांधी रोड, जिल्हा रूग्णालयात धावपळ
By Admin | Updated: July 28, 2015 00:55 IST2015-07-28T00:55:17+5:302015-07-28T00:55:55+5:30
महात्मा गांधी रोड, जिल्हा रूग्णालयात धावपळ

अफवांचे ‘स्फोट’महात्मा गांधी रोड, जिल्हा रूग्णालयात धावपळ
नाशिक : पंजाब येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी केलेला असतानाच दुपारी २ वाजेच्या सुमारास भर वर्दळीच्या महात्मा गांधीरोडवरील यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षक भिंतीजवळ बेवारस बॅग सापडल्याने नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला. साधारणत: तासभर या रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळवून बॉम्बशोधक व नाशक पथकाने संशयित बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात कपडे व भ्रमणध्वनी चार्जर सापडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला ही घटना होत नाही तोच, जिल्हा रुग्णालयातही अशाच बेवारस बॅगेने पोलिसांची धावपळ उडवली.
शहरातील अतिशय महत्त्वाचा व वर्दळीच्या महात्मा गांधी रोडवर बेवारस बॅग सकाळपासून रस्त्याच्या कडेला पडलेली असल्याची खबर एका व्यक्तीने सरकारवाडा पोलिसांना दिल्यानंतर तत्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनीही बेवारस बॅग पाहण्यासाठी गर्दी केली त्याचबरोबर नजीकच्या व्यावसायिकांनी जिवाच्या भीतीपोटी दुकाने पटापट बंद करून घरचा रस्ता धरणे पसंत केले.