Rs. 5,000 / - to employees of Municipal Corporation | मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांचे सानुग्रह

मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांचे सानुग्रह

ठळक मुद्देखुशखबर : वेतन आयोगाची दिवाळी भेट शक्य

नाशिक : विधानसभा निवडणुकीमुळे कोणताही धोरणात्मक निर्णय अडू नये यासाठी सर्वच यंत्रणा तातडीने निर्णय घेत असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १४ हजार रुपये सानुग्रह देण्याचा तातडीने निर्णय गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणेच हे अनुदान आहे. तथापि, राज्य शासनाकडून लवकरच सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय होणार असल्याने तीदेखील दिवाळी भेटच ठरणार आहे. त्यामुळे यंदा गतवर्षी प्रमाणेच सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी कर्मचाºयांना दिवाळी सानुग्रह अनुदान देताना गतवर्षीच्या तुलनेत जास्त दिला जातो. परंतु यंदा सातव्या वेतन आयोगामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने महापालिकेने अधिक आर्थिक जोखीम घेतली नाही. गुरुवारी (दि.१९) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेत महापौर रंजना भानसी तसेच अन्य पदाधिकारी आणि गटनेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्या अनुषंघाने महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग महासभेत महासभेने मंजूर करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. लवकरच शासनाकडून यास मंजुरी मिळणार असल्याने कर्मचाºयांना ही दिवाळीची भेट ठरणार आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

Web Title: Rs. 5,000 / - to employees of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.