मालेगावी चोरी २७ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:02 IST2020-06-22T21:46:00+5:302020-06-22T23:02:58+5:30
मालेगाव : शहरातील चिखलओहोळ शिवारासह झोडगे शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जबरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाख ४४ हजारांचा ऐवज लुटून नेला.

मालेगावी चोरी २७ लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील चिखलओहोळ शिवारासह झोडगे शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जबरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाख ४४ हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी अवधेशकुमार हिरशंकर सरोज एम (३२) रा. बहुरियापूर कुशाह (उत्तर प्रदेश) या टँकर चालकाने तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सफेद रंगाची कार क्रमांक एमएच ०१ सीव्ही ९९५१ मधील ३ ते ४ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गेल्या शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राष्टÑीय महामार्ग क्र. ३ वर चिखलओहोळ शिवारात रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ धुळेकडून मालेगावकडे येणाऱ्या रस्त्यावर सफेद रंगाच्या कारमधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या ताब्यातील टँकरमधील २० लाख रूपये किंमतीचा टाटा कंपनीचा १४ टायरचा डांबराचा टँकर क्रमांक जीजे ०६ बीटी ०३२७ तसेच ७ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा टँकर क्रमांक जीजे ०६ बीटी ०३२७ मध्ये भरलेले २७ टन डांबर, ५ हजार रूपये किंमतीचा भ्रमणध्वनी संच व ३ हजार रूपयांची रोकड असा एकूण २७ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून चोरून नेला म्हणून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.