‘गिरणा’तून पांझण कालव्यास आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST2020-02-25T22:23:09+5:302020-02-26T00:15:17+5:30
कळवाडी : मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणातून डाव्या पांझण कालव्यास ७५ क्यूसेक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ...

‘गिरणा’तून पांझण कालव्यास आवर्तन
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये आनंद : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
कळवाडी : मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणातून डाव्या पांझण कालव्यास ७५ क्यूसेक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून पाण्याच्या आवर्तनाची मागणी सुरू होती. पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. गिरणा धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे. परिसरातील सर्व शिवारातील रब्बी पिकांना याचा उपयोग होत आहे.