रोटरीचे कार्य आदर्शवत : पाटील

By admin | Published: July 16, 2014 11:42 PM2014-07-16T23:42:32+5:302014-07-17T00:28:14+5:30

रोटरीचे कार्य आदर्शवत : पाटील

Rotary's work is ideally: Patil | रोटरीचे कार्य आदर्शवत : पाटील

रोटरीचे कार्य आदर्शवत : पाटील

Next

देवळा/खुंटेवाडी : सेवाभावी संस्थाच्या सामाजिक चळवळीतून समाज घडत असतो. रोटरी
क्लबही लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. देवळा-सटाणासारख्या ग्रामीण भागात रोटरीचे चाललेले कार्य आदर्शवत आहे, असे
प्रतिपादन वनाधिपती विनायक पाटील यांनी येथे केले. देवळा महाविद्यालयात आयोजित रोटरी क्लब आॅफ देवळा व सटाणा यांच्या संयुक्त व पदग्रहण समारंभात पाटील बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘लाईट अप रोटरी’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येऊन गुणवंत विद्यार्थी व रोटरियन सदस्यांचा
गौरव करण्यात आला. मावळते अध्यक्ष संदीप पगार (देवळा) व अभिजित बागड (सटाणा) यांनी आपल्या प्रास्ताविकात गेल्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला.
नूतन अध्यक्ष सुरेश अहेर (देवळा), तुषार महाजन (सटाणा) व नूतन सचिव प्रा. पोपटराव सागर (देवळा), डॉ. जयवंत महाले (सटाणा) यांनी यावेळी पदभार स्वीकारला. रोटरीचे उपप्रांतपाल डॉ. व्ही. एम. निकम व डॉ. प्रकाश जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनात रोटरीचा संदेश प्रस्तुत केला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार शिरीष कोतवाल, माजी आमदार शांताराम अहेर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा सचिव श्री. सौंदाणकर, प्राचार्य हितेंद्र अहेर, डॉ. वसंतराव अहेर, माजी सरपंच जितेंद्र अहेर, बाजार समिती संचालक तथा रोटेरियन जगदीश पवार, दिलीप अहेर, कौतिक पवार, भालचंद्र बागड, विलास शिरोरे, यांच्यासह देवळा व सटाण्यातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. प्रा. एकनाथ पगार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Rotary's work is ideally: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.