रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:24 IST2019-07-23T00:23:55+5:302019-07-23T00:24:19+5:30

रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला.

 Rotary Club Nashik Smart City Inauguration Ceremony | रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

सिडको : रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला.
रोटरी क्लबनाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा नाशकात संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल नागपूरचे राजे संग्रामसिंह भोसले, ए.बी.बी. कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन तुषार चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर धामणे यांनी मानले. कार्यक्र मास सहायक प्रांतपाल वैशाली प्रधान, शरयू देशमुख, रमेश मेहर, आशा वेणुगोपाल, नरेश शहा, संजय कलंत्री, गुरु मितसिंग रावल, नाना शेवाळे, संजय क्षत्रिय, स्नेहा लिमये यांसह रोटरियन सभासद उपस्थित होते.
कार्यक्र मात नवनियुक्त अध्यक्ष सतीश शेटे यांनी मावळते अध्यक्ष लता पिल्लाई यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. तसेच नवनियुक्त सचिव ज्ञानेश्वर धामणे यांनी मावळते सचिव हरिकृष्ण कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यक्र मात पाहुण्यांच्या हस्ते उपाध्यक्ष हरिकृष्ण कुलकर्णी, खजिनदार मिलिंद पगार, सहसचिव अर्पणा भारावार तसेच विविध समित्यांवर नियुक्त झालेले माजी अध्यक्ष तुषार चव्हाण, सुनील सौंदाणकर, अशोक शेलार, राजेंद्र पाटील, डॉ. विशाल गुंजाळ, लक्ष्मीकांत जगताप, प्रवीण मारावर, स्वाती चव्हाण यांनी पदभार स्वीकारला.

Web Title:  Rotary Club Nashik Smart City Inauguration Ceremony