वृत्तपत्रांची भूमिका समाजासाठी कायमच मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:36 PM2020-05-22T21:36:11+5:302020-05-22T23:50:20+5:30

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान ...

 The role of newspapers is always a guide for the society | वृत्तपत्रांची भूमिका समाजासाठी कायमच मार्गदर्शक

वृत्तपत्रांची भूमिका समाजासाठी कायमच मार्गदर्शक

Next

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान आणून देण्याचे काम वृत्तपत्रे करतात. त्याचबरोबर समाजालादेखील मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात. वृत्तपत्रांमधून विविध क्षेत्रांतील घडामोडींविषयी अचूक व विश्वासार्ह माहिती सविस्तरपणे वाचकांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचन पूर्वीप्रमाणेच आनंददायी बनले आहे, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
----------------
सकाळी समोर चहाचा कप, हातात वृत्तपत्र ही मराठी माणसांची दिवसाच्या चांगल्या सुरु वातीची कल्पना आहे. काही दिवस वृत्तपत्रे येत नव्हती. आपण सगळेच या सुखाला पारखे झालो होतो. आता हा आनंद पुन्हा मिळू  लागला आहे. बातम्या मिळण्याचे अनेक स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पण वृत्तपत्र हे जवळचे आणि विश्वासार्ह वाटते.
- विनायकदादा पाटील, माजी मंत्री
---------------------
सध्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र पुनश्च सुरू होणे ही दिलासादायक बाब आहे. वृत्तपत्रांमुळे परिसरातील तसेच संपूर्ण विश्वातील घटना, घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळते. वृत्तपत्र सामान्य नागरिकांच्या जीवनातील माहितीचा महत्त्वाचा दुवा आहे. वृत्तपत्रांचे नियमितपणे सुरू होणे पुन्हा एकदा जगाशी जोडले जाण्यासारखे आहे.- नानासाहेब बोरस्ते, प्रभारी अध्यक्ष, सावाना
-------------------
वृत्तपत्र वाचनाने मिळणारी प्रत्येक माहिती अधिकृत आणि खात्रीशीर असल्याने त्याबाबत
पुन्हा खात्री करून घेण्याची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा पूर्वीप्रमाणे वाचायला मिळू लागल्याने माहिती आणि ज्ञानाचा अखंड झरा पुन्हा एकदा वाहू लागला आहे. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ
----------------------
वृत्तपत्र वाचणे ही वर्षानुवर्षांची सवय बनलेली आहे. त्यामुळे वृत्तपत्र सुरू झाल्याने अत्यंत आनंद
झाला. वृत्तपत्रे वाचताना डोळ्यांना किंवा हातांना श्रम पडत नाहीत. ती आपल्या सोयीनुसार घरातील सर्वांनाच वाचता
येत असल्याने पुन्हा एकदा वृत्तपत्र वाचनाचा मनमुराद आनंद घेत आहे. - रवींद्र ढवळे, ज्येष्ठ रंगकर्मी
-------------------
वृत्तपत्रे हीच सर्वाधिक विश्वासार्ह माहितीचा स्रोत असतात. त्यामुळे वृत्तपत्र सुरू होणे हा पुन्हा एकदा विश्वासार्ह माहिती हाती पडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग झाले. वृत्तपत्रातील बातमी खात्रीशीर असल्याने पुन्हा शहानिशा करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा सुरू झाल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. - सुरेश गायधनी, रंगकर्मी

Web Title:  The role of newspapers is always a guide for the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक