नाशिकमध्ये पतंग काढताना विद्युत रोहित्राचा शॉक : मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:13 IST2018-01-15T22:12:24+5:302018-01-15T22:13:20+5:30
नाशिक : विद्युत रोहित्राला अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने नऊ वर्षीय बालक भाजून जखमी झाल्याची घटना जुना आडगाव नाक्यावरील साईकृती अपार्टमेंटजवळ सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली़ पीयूष संजय शिंगणे (९) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून, त्यास उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये पतंग काढताना विद्युत रोहित्राचा शॉक : मुलगा जखमी
नाशिक : विद्युत रोहित्राला अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने नऊ वर्षीय बालक भाजून जखमी झाल्याची घटना जुना आडगाव नाक्यावरील साईकृती अपार्टमेंटजवळ सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली़ पीयूष संजय शिंगणे (९) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून, त्यास उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना आडगाव नाक्यावरील साईकृती अपार्टमेंट येथे राहणारा पीयूष शिंगणे हा दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या आवारात खेळत असताना पतंग कटून आला व इमारतीजवळील विद्युत रोहित्रास अडकला़ पतंग काढण्यासाठी पीयूषने विद्युत रोहित्राकडे धाव घेतली व रोहित्रावर चढताच विजेच्या धक्क्याने तो फेकला गेला़ तसेच विद्युत रोहित्रातून आग निघाल्याने त्याचा पाठीचा भाग भाजला़
विद्युत रोहित्राजवळ झालेल्या मोठ्या आवाजामुळे इमारतीतील व आजूबाजूचे नागरिक तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता पीयूष हा रोहित्राजवळ पडलेला दिसला. नागरिकांनी तत्काळ तेथे माती टाकून आग विझविली व जखमी पीयूषला बाहेर काढले़ यानंतर नातेवाइकांनी तत्काळ त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तो सुमारे २० टक्के भाजला आहे़