डोळ्यात मिरचीपूड फेकून सराफाची १० लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:08 IST2019-10-20T01:07:45+5:302019-10-20T01:08:47+5:30

मालेगाव शहरातील चंदनपुरी भागातील सराफ व्यावसायिक झुंबरलाल दामोदर बागुल, रा. कलेक्टरपट्टा हे दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अज्ञात भामट्यांनी १० लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

Robbery worth Rs 5 lakh by throwing pepper in the eye | डोळ्यात मिरचीपूड फेकून सराफाची १० लाखांची लूट

डोळ्यात मिरचीपूड फेकून सराफाची १० लाखांची लूट

मालेगाव : शहरातील चंदनपुरी भागातील सराफ व्यावसायिक झुंबरलाल दामोदर बागुल, रा. कलेक्टरपट्टा हे दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अज्ञात भामट्यांनी १० लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बागुल यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संगमेश्वर भागातील नवनाथनगर परिसरात हा लुटीचा प्रकार घडला. बागुल हे त्यांची दुचाकीने (क्र. एमएच ४१ ए २६८०) घरी जात असताना त्यांच्या मागावर असलेल्या भामट्यांनी नवनाथनगर भागातील एका बोळीत बागुल यांच्या डोळ्यांच्या दिशेने मिरचीपूड फेकली. बागुल यांची सोने ठेवलेली पिशवी व दुचाकी घेऊन पलायन केले. बागुल यांनी दुचाकीच्या डिक्कीतही दागिने ठेवले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले करीत आहेत.

Web Title: Robbery worth Rs 5 lakh by throwing pepper in the eye