कपड्यावर डाग पडल्याचे सांगून वृद्धाची लाखाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:55 PM2018-10-17T23:55:37+5:302018-10-18T00:14:23+5:30

तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़

The robbery of the old man by stating that the clothes have been stained | कपड्यावर डाग पडल्याचे सांगून वृद्धाची लाखाची लूट

कपड्यावर डाग पडल्याचे सांगून वृद्धाची लाखाची लूट

googlenewsNext

नाशिक : तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़  आडगाव शिवारातील भारतनगरमधील रहिवासी नारायण वैद्य (७८, रा़ शिवशाही अपार्टमेंट) हे आडगाव नाक्यावरील देना बँकेत गेले होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले एक लाख रुपये पिशवीत ठेवून ते निमाणीकडे जात होते़ यावेळी पाठीमागून आलेल्या संशयिताने त्यांना कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगितले़ त्यामुळे नारायण वैद्य हे वडापावच्या टपरीवर गेले व डाग पाण्याने धुवत असताना चोरट्यांनी त्यांची रोकड असलेली पिशवी चोरून नेली़ या प्रकरणी वैद्य यांच्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The robbery of the old man by stating that the clothes have been stained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.