दारू दुकानात चाकूचा धाक दाखवत लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:39 IST2022-02-05T22:35:23+5:302022-02-05T22:39:14+5:30
मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मागे असणाऱ्या माणके कंपाउंड येथील देशी दारू दुकानात चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला.

दारू दुकानात चाकूचा धाक दाखवत लूट
ठळक मुद्देयाप्रकरणी विधी संघर्षीत बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मागे असणाऱ्या माणके कंपाउंड येथील देशी दारू दुकानात चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी विधी संघर्षीत बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, थारूमल किसनचंद फुलवाणी रा.मनमाड यांनी फिर्याद दिली आहे. मनमाड पोलीस ठाण्यात भादंवि ३९२,४५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जे.यु.तायडे करीत आहेत.