शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

दरोडेखोरांचा पोलिसांकडून सिनेस्टाइल पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:17 IST

सातपूर कॉलनी परिसरात मंगळवारी (दि.२४) भल्या पहाटे एका एटीएमची जबरी लूट दोघा पोलीस बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे टळली. दरोडेखोरांच्या टोळीने पोलिसांना बघून रोकडचा बॉक्स घटनास्थळी फेकून देत बोलेरो जीपमधून धूम ठोकली.

पंचवटी : सातपूर कॉलनी परिसरात मंगळवारी (दि.२४) भल्या पहाटे एका एटीएमची जबरी लूट दोघा पोलीस बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे टळली. दरोडेखोरांच्या टोळीने पोलिसांना बघून रोकडचा बॉक्स घटनास्थळी फेकून देत बोलेरो जीपमधून धूम ठोकली. यावेळी बीट मार्शल पोलिसांनी जबरी चोरीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देत तत्काळ जीपचे वर्णन व मार्ग सांगितला. यानंतर सर्व पोलीस ठाण्यांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने सापळा रचून पंचवटीत दोघांना जीपसह ताब्यात घेतले तर चौघे अंधाराचा फायदा घेत फरार होण्यास यशस्वी ठरले.याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बॅँकेच्या एटीएमला धुळे येथील दरोडेखोरांच्या टोळीने लक्ष्य केले. एटीएम टायर-रोपच्या सहाय्याने जीपद्वारे ओढून ते उचकटून टाकले. त्यानंतर एटीएम कापून त्यामधील रोकडचा बॉक्स घेऊन पळ काढणार तोच तेथे बीट मार्शल पोलीस नाईक शरद झोले, दीपक धोंगडे हे दाखल झाले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी रोकडचा बॉक्स जीपखाली टाकून जीपमध्ये बसून पलायन केले.झोले यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला ‘कॉल’ दिला. तत्काळ नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यांना ‘अ‍ॅलर्ट’ जारी केला आणि दरोडेखोरांसह वाहनाचे वर्णन कळविण्यात आले. तत्काळ सातपूर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्री गस्तीवर असलेली सर्व पथके सतर्क झाली आणि विविध भागांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी के ली गेली व सापळे रचण्यात आले. सुमारे अर्धा ते पाऊण तास दरोडेखोर भरधाव जीप शहरातून दामटवित होते. द्वारका येथून त्यांनी उड्डाणपुलाचा मार्ग धरला. वाघ महाविद्यालयाजवळ ते पुन्हा खाली उतरले आणि अमृतधामकडे जात असताना पोलिसांची नाकाबंदी बघून त्यांनी महामार्गावरून यू-टर्न द्वारकेच्या दिशेने घेतला. परंतु द्वारकेकडून पोलिसांचे वाहने येत असल्याचे बघून समांतर रस्त्यावरून दरोडेखोर थेट हिरावाडीतील विधातेनगरमध्ये वेगाने गेले. कॉलनी रस्त्यांची माहिती नसल्यामुळे ‘दी-एण्ड’ पॉइंटला जाऊन थांबले असता पुन्हा जीप वळविण्याच्या प्रयत्नात येथील ‘जान्हवी’ बंगल्याच्या संरक्षक भिंतीला जीपची धडक बसली. त्यामुळे दरोडेखोरांनी जीप सोडून पळण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या; मात्र चौघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.बोलेरोची रावेरमधून चोरीचोरट्यांनी (एमएच १९, एएक्स ३२६०) या क्रमांकाची पाटी लावून शहरात प्रवेश केला. तसेच (एमएच १५, जीके ७७३४) अशा क्रमांकाची पाटी जीपमध्ये बाळगल्याचे समोर आले आहे. राखाडी रंगाची बोलेरो जीप दरोडेखोरांनी रावेरमधून चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.बीट मार्शल जोडीलाप्रत्येकी २५ हजारांचे बक्षीसनियंत्रण कक्षाला वेळीच सतर्क करत अतिरिक्त मदत मागून दरोडेखोरांना अटकाव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी शरद झोले, दीपक धोंगडे हे या थरारनाट्यामधील खरे ‘हिरो’ ठरले. त्यांच्या सतर्कतेमुळेच एटीएमची रोकड सुरक्षित राहिली आणि दोघा दरोडेखोरांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या चोख कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस पोलीस नाईक शरद झोले, दीपक धोंगडे यांना जाहीर केले आहे.२० ते २२ वाहने रस्त्यांवर बीट मार्शलकडून नियंत्रण कक्षाला ‘कॉल’ मिळताच सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्र गस्तीवर असलेली पथके सतर्क झाली. सातपूर, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव आदी पोलीस ठाण्यांचे मिळून सुमारे २० ते २२ वाहने रस्त्यावर आली. आपापसांत संवाद साधून बिनतारी संदेश यंत्रणेवरून सापळे रचले गेले आणि दरोडेखोरांचा पाठलाग करत सराईत गुन्हेगार मिलनसिंग रामसिंग भादा, गजानन मोतीराम कोळी (दोघे, रा. मोहाडी, जि. धुळे) या दोघांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. त्यांचे चौघे साथीदार मात्र शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सराफ बाजार (बोहरपट्टी)मधून पसार होण्यास यशस्वी ठरले

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी