शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते जलमय : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची शहरात जोरदार ‘बॅटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:41 IST

नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली.

ठळक मुद्देहोळकर पूलाखालून रामकुंडात २ हजार ४३८ क्युसेक पाणी दीड तासांत २१.१ मिमी इतका पाऊस झाला

नाशिक : शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१३) मान्सूनच्या पावसाने जोरदार झोडपले. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. यामुळे नागरिक घामाघुम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत मुख्य शहरासह उपनगरांमध्ये धो-धो पाऊस कोसळला. पावसाच्या धुव्वाधार ‘बॅटिंग’मुळे मनपाच्या गटारींची दैनावस्था तर झालीच मात्र नैसर्गिक नाल्यांनाही पूर आला. गोदावरीच्या अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात रात्री नऊ वाजेपासून २ हजार ४३८ क्युसेक पाणी प्रवाहित झालेले होते. यावरून शहरात झालेल्या पावसाचा जोर सहज लक्षात येऊ शकतो.शहरातील रस्त्यांवर अक्षरक्ष: तलावासारखे पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. पावसाचा जोर जुने नाशिक, टाकळी, नाशिकरोड, गांधीनगर, अशोकामार्ग, डीजीपीनगर-१, वडाळागाव, द्वारका या भागात अधिक होता. शहरात संध्याकाळी साडेपाचनंतर केवळ दीड तासांत २१.१ मिमी इतका पाऊस झाला.

नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. तोपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचे आगमन झाले नव्हते. साधारणत: अर्ध्या तासानंतर पावसाचे ढग शहराच्या मध्यवर्ती परिसराकडे सरकले आणि साडेपाच वाजेपासून जोरदार पावसाला मखमलाबाद, म्हसरूळ, पंचवटी, रविवार कारंजा, सीबीएस, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, इंदिरानगर, पाथर्डीफाटा या भागात पावसाला सुरूवात झाली. शहर व परिसरात सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सर्वच भागातील लहानमोठे रस्ते जलमय झाले होते.

खोडेनगर-अशोकामार्गचा नैसर्गिक नाला असो किंवा वडाळागावाचा म्हसोबा महाराज मंदिरापासून वाहणारा नैसर्गिक नाल्याला अक्षरक्ष: पूर आला होता. या नाल्यांचे पाणी एखाद्या नदीप्रमाणे वेगाने वाहत होते. वडाळागावाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कमरेइतके पाणी मुख्य रस्त्यावर प्रथमच साचले. यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरले. तसेच वडाळारोडलगत असलेल्या जयदीपनगर, मिल्लतनगर, चिश्तीया कॉलनी या वसाहतींमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने येथील मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. असेच काहीसे चित्र अशोकामार्ग परिसरात बघावयास मिळाले. येथील मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. पावसाचे आगमन होताच या भागाचा विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊसgodavariगोदावरी