शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

कळवण शहरात रोडरोमिओंचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:19 PM

कळवण शहरातील शाळा, महाविद्यालय व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे उपद्रवी वाढले असून, पोलीस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

कळवण : कळवण शहरातील शाळा, महाविद्यालय व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे उपद्रवी वाढले असून, पोलीस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.  शिवाय दुचाकींचा रेस खेळतात असे उद्योग वाढले आहेत. शाळा, महाविद्यालय सुटल्यावर रोडरोमिओ मुलींचा पाठलाग करतात व त्यांची छेडछाड करतात. त्यामुळे कळवण पोलिसांनी या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी पुढे आली असून, रोडरोमिओंवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय पगार, सचिन पगार, सुजित हिरे, समर्थ रौंदळ, सुमित रोकडे, पवन पगार, राज देवघरे आदी विद्यार्थी उपस्थित होते .  विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालय परिसरात काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.बुधवारी पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी एस. टी. बसस्थानक, महाविद्यालय व शाळा परिसरात सकाळपासून बंदोबस्त ठेवत मोहीम राबविली. शिवाय वाहतूक पोलिसांनी रोडरोमिओंच्या दुचाकींना आडकाठी घातली.  शहरातील महाविद्यालय व शाळा परिसरात व एस. टी. बसस्थानक परिसरात पोलिसांची या रोडरोमिओंवर कारवाई झाल्याशिवाय त्यांच्यात सुधारणा होणार नाही, असे मत प्रा. किशोर पगार यांनी व्यक्त केले. दुचाकींच्या शर्यतींमुळे नागरिकांना त्रास शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या काळात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे आढळून येतात. याच वेळेत एकाच रस्त्यावरून अनेक वेळा चकरा मारणाºया दुचाकीस्वारांना अडवून त्यांची तपासणी करावी. चौकशीत या भागात त्यांचे नेमके काय काम आहे याची विचारणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून या परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला असून, मुलींची छेडछाड करून त्यांना त्रास देत आहेत. शाळा व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे दुचाकी वाहने भरधाव चालवत असून, त्यांच्या रेस लावण्याच्या व कर्णकर्कश हॉर्न वाजवण्याच्या प्रकारामुळे इतरांना खूपच त्रास होतो आहे.

टॅग्स :Nashikनाशिक