तळेगाव ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 00:56 IST2021-09-23T00:55:58+5:302021-09-23T00:56:45+5:30

त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्याला जोडणारा तळेगाव (अंजनेरी) ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे जांभूळ जीरा तलावाजवळ खचला असून अर्ध्याच्या वर रस्ता तुटून पाण्यात गेला आहे.

The road from Talegaon to Jategaon was damaged due to heavy rains | तळेगाव ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे खचला

तळेगाव ते जातेगावदरम्यान पावसामुळे खचलेला रस्ता.

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्याला जोडणारा तळेगाव (अंजनेरी) ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे जांभूळ जीरा तलावाजवळ खचला असून अर्ध्याच्या वर रस्ता तुटून पाण्यात गेला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तळेगाव अंजनेरी ते जातेगाव रस्त्यावरील जांभूळ जीरा या तलावाजवळचा रस्ता खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. या रस्त्याचा वापर लोकांनी करू नये म्हणून ग्रामपंचायतीने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

 

Web Title: The road from Talegaon to Jategaon was damaged due to heavy rains