शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर फाटा ते शिंदेगाव रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिक : अनलॉकनंतर नाशिकचे जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. त्यामुळे आता नाशिकमधील सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील ...

शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

नाशिक : अनलॉकनंतर नाशिकचे जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. त्यामुळे आता नाशिकमधील सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील वाढली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्रमांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे नाशिककर रसिक प्रेक्षकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे.

रोटरी क्लबच्यावतीने इंटरॅक्ट सप्ताह

नाशिक : विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण कौशल्य विकासाला चालना मिळावी, यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्यावतीने ‘इंटरॅक्ट वीक सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवारपासून या सप्ताहाला प्रारंभ झाला. हा सप्ताह ऑनलाईन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहात क्रीडा, कृषी, शिक्षण, आरोग्य, औद्येागिक, कला, साहित्य, सामाजिक असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

नाशिक : विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भ्रष्टाचार प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत विभागातील कामांचा आढावा घेण्यात आला. शासकीय कामकाजात सुलभता तसेच पारदर्शकता आणावी, अशा सूचना गमे यांनी दिल्या. नवनियुक्त अशासकीय सदस्यांशीदेखील यावेळी गर्म यांनी चर्चा केली.

वीजतारांना पतंगाच्या मांजाचा वेढा

नाशिक : पतंगोत्सव संपला असला, तरी अजूनही शहरातील वीज तारांवर पतंगांचा मांजा लटकलेला दिसत आहे. काही ठिकाणी तारांवरील मांजा खाली लोंबकळत असून, अनेक ठिकाणी मांजा तारांभोवत लपटलेला दिसून येत आहे. तारांवर पक्षी बसल्यास मांजामध्ये अडकण्याची शक्यता आहे.

उपनगर मार्गावर गतिरोधक टाकावा

नाशिक : उपनगर मार्गावर नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने हा मार्ग वाहनधारकांसाठी सुलभ झाला आहे. या मार्गावरील मार्केट, रहिवासी क्षेत्र असल्याने नव्याने डांबरीकरण झालेल्या मार्गावर गतिरोधक टाकण्याची आवश्यकता आहे. विशेषत: टाकळीकडे जाणारा मार्ग तसेच शांती पार्ककडे जाणाऱ्या मार्गाजवळ गतिरोधक टाकण्याची गरज आहे.