झाडे टाकून रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:00 IST2020-04-14T23:41:50+5:302020-04-15T00:00:11+5:30
कोरोनामुळे देशभरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्यामुळे सर्वत्र सतर्कता राखली जात आहे. मात्र अशा वातावरणात दोन तालुक्यांना जोडणारा रस्ताच अनेक ठिकाणी मोठे झाडे टाकून रहदारीसाठी बंद केल्याने नायगाव खोºयात संताप व्यक्त होत आहे.

सिन्नर - नायगाव - सायखेडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर कडेची झाडे तोडून ती रस्त्यावर टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नायगाव : कोरोनामुळे देशभरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्यामुळे सर्वत्र सतर्कता राखली जात आहे. मात्र अशा वातावरणात दोन तालुक्यांना जोडणारा रस्ताच अनेक ठिकाणी मोठे झाडे टाकून रहदारीसाठी बंद केल्याने नायगाव खोºयात संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाबरोबर राज्य शासनानेही लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. अशा वातावरणात नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरातच राहणे गरजेचे आहे ग्रामीण भागात अनेक गावांनी आपले प्रवेशद्वार बंद करून गावात शंभर टक्के लॉकडाउन केले आहे मात्र अशा परिस्थतीत दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर - नायगाव- सायखेडा हा महत्त्वाचा रस्ताच मंगळवारी दुपारनंतर अचानक तीन-चार ठिकाणी रस्त्याच्या कडेची झाडे तोडून आडवी टाकून बंद करण्यात आला. रस्ता बंद असल्यामुळे अनेकांना अडचणींच्या रस्त्याने प्रवास करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
दूध, भाजीपाला विक्री करणाऱ्यांना तसेच दवाखान्यात जाणाºयांना या रस्ता बंदमुळे माळेगावमार्गे जावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गाव बंद करणे योग्य असले तरी दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता तोही रस्त्याच्या कडेचे मोठ-मोठे झाडे तोडून तसेच काचा टाकून वाहतुकीसाठी रस्ता बंद केल्याने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांमध्य संताप व्यक्त होत आहे.