रस्त्याची हद्द, नागरिक बेहद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:46+5:302021-09-24T04:15:46+5:30

मांडवड : गेल्या महिनाभरापासून नांदगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नांदगावला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून शाकंबरी ...

Road boundary, citizen boundary | रस्त्याची हद्द, नागरिक बेहद्द

रस्त्याची हद्द, नागरिक बेहद्द

मांडवड : गेल्या महिनाभरापासून नांदगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नांदगावला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून शाकंबरी नदीवर असलेले फरशीपूल असून नसल्यासारखे झाले आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे नांदगावजवळील रेल्वेनाला फरशीपूल तर वाहूनच गेला आहे. त्यामुळे मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, पाटखाना, पिंजरवाडी आदी गावांतील नागरिकांना नांदगाव शहरात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या फरशीपुलाबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कळविले असता, ते अधिकारी सांगतात, तिथे आमची हद्द नाही. ती नगरपालिकेची किंवा रेल्वेची हद्द आहे. तेव्हा आम्ही त्या फरशीपुलाचे काम करू शकत नाही आणि नांदगाव नगरपालिका फरशीपुलाकडे लक्ष देत नाही. कारण, तो पूल शहराच्या बाहेर असल्याने त्यांना त्याची गरज भासत नाही आणि रेल्वे हद्दीत असेल तर रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. तेव्हा वरील गावांतील नागरिकांनी आता हा हद्दवाद कोणाकडे मांडायचा आणि ही समस्या कोण सोडवेल, हा प्रश्न उभा राहिला आहे. वरील गावातील नागरिकांना नांदगाव शहरात एकमेव फरशीपूल आहे आणि तोही पुराच्या पाण्याने वाहून गेला. फरशीपूल नेमका कुणाच्या हद्दीत आणि तो नवीन तयार कोणता विभाग करणार आणि वरील गावकऱ्यांना नांदगावला जाण्यासाठी सरळ मार्ग कधी मिळणार? या हद्दवादात आमची हेळसांड कधी थांबणार, असा सवाल नागरिक करत आहे. (२३ मांडवड)

230921\img_20210910_093003.jpg~230921\23nsk_8_23092021_13.jpg

नांदगाव शहरा जवळील वाहुन गेलेला फरशी पुलावरून नागरिकांना कसरत करावी लागत आहे~२३ मांडवड

Web Title: Road boundary, citizen boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.