रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:09 AM2017-12-16T01:09:43+5:302017-12-16T01:10:50+5:30

वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही.

Road blockade: More on recovery than compliance with rules: General citizens 'targets' | रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

Next
ठळक मुद्दे सर्वसामान्य नागरिकच अडचणीत हवालदारानेच तक्रार केल्याचा विषय गाजला कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन

नाशिक : वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही. साहजिक नियम पालनापेक्षा अधिक भर वसुलीवर असल्याने पोलिसांचे कर्तव्यपालन नागरिकांना मात्र जाच ठरत आहे.
शहरात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यातच अपुºया भौतिक सुविधा यामुळे समस्या जटिल होत चालली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकच अडचणीत आणले जातात. मुळात वाहतूक पोलिसांना नियुक्त करताना कोणते निकष लावले जातात हे जणू उघड गुपित आहे. मुंबईच्या एका हवालदारानेच याबाबत तक्रार केल्याचा विषय राज्यभरात गाजला होता. परंतु अशा टार्गेटपूर्तीसाठी सर्वसामान्य वेठीस धरले जातात. अनेक ठिकाणी तर भल्या सकाळी दिवसभराचे टार्गेट वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एकदा केसेसची शासकीय उद्दिष्टपूर्ती झाली की पुढे काय होते हे वेगळे विचारण्याची गरज नाही. पोलिसांच्या या वसुलीची महाराष्टÑाबाहेरही चर्चा पसरली आहे. त्र्यंबकरोडला जाताना येणाºया अडचणी हे अनेक देशांतील वाहतूक व्यावसायिकांना मनस्ताप देणारे ठरले आहे. एकदा तर अकारण वसुलीचा प्रयत्न झाल्यानंतर परराज्यातील भाविकांनी रस्त्यावरच ठाण मांडून पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर मांडली होती.
अलीकडे तर मोहिमा अगोदरच सोशल मीडियावरून व्हायरल होतात आणि त्यानंतर पोलिसांच्या जाचापासून सुटका करण्यासाठी नागरिकांना मार्ग बदल करावे लागतात. सुरक्षिततेची काळजी प्रत्येकाला असते आणि त्यात कसूर झाला तर जिवावर बेतते. कित्येकदा गुन्हेगारीशी याचा संबंध असतो. हे सर्व मान्य केले तरी कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन पोलीस दलातील शीर्ष अधिकारी तरी कसे करणार?
तेव्हा कुठे असतात वाहतूक पोलीस?
शहरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. कोणताही सिग्नल असो तो तोडणारे वाहनचालक असतात. त्यातून अपघात होतात. परंतु बिटको सिग्नल, त्रिमूर्ती चौक, नागजी चौफुली, काठे गल्ली सिग्नल, मेहेर सिग्नल अशा अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना नेमके पोलीस नसतात; परंतु एखाद्या मार्गावर मात्र दबा धरून बसलेले पोलीस सहज अवतीर्ण होतात, हादेखील नागरिकांच्या दृष्टीने आश्चर्याचा भाग ठरला आहे.

Web Title: Road blockade: More on recovery than compliance with rules: General citizens 'targets'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.