रिक्षाची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:35 IST2019-03-13T00:34:39+5:302019-03-13T00:35:49+5:30
दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका परिसरात घडली.

रिक्षाची दुचाकीला धडक
नाशिक : दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका परिसरात घडली.
पिंट्या उर्फ रवि राजू भगत (३०, रा. वडाळागाव) रिक्षा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला रिक्षाचा धक्का लागला. यावरून दुचाकीचालक धनंजय महेश गायकवाड (रा. काजीपुरा) याच्यासह दोघा अज्ञात युवकांनी रवि यास मारहाण केल्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच गायकवाड याने रिक्षाचालक रवि हा वडाळानाक्याकडे सारडासर्कलकडून विरुद्ध दिशेने येत असताना दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत गायकवाड व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मातोश्री हे जखमी झाले आहेत असे पोलिसांनी सांगितले़