रिक्षाचालकाने दहा हजारांचे पाकीट केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST2019-09-14T22:51:00+5:302019-09-15T00:18:39+5:30
प्रवाशाचे सापडलेले दहा हजार रुपयांचे पाकीट रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

रिक्षाचालकाने दहा हजारांचे पाकीट केले परत
नाशिक : प्रवाशाचे सापडलेले दहा हजार रुपयांचे पाकीट रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
लासलगाव येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी लतीफ पठाण हे नाशिकला आले असता द्वारका स्टॉपवर ते काळ्या-पिवळ्या गाडीने उतरले. द्वारका बस स्टॉपवर थांबले असता तिथे त्यांचे पाकीट पडले. त्यामध्ये त्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड व १0,५00 रुपये असे होते. सदर पाकीट श्रमिक सेनेचे रिक्षाचालक राजेंद्र गांगुर्डे यांना सापडले. त्यांनी श्रमिक सेनेचे शाखा प्रमुख आलिम यांना याबाबत कळविले. श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष भगवंत पाठक व बारवकर, अलिम शेख यांनी त्वरित मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठले व मुंबई नाका पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाळ यांनी त्या कागदपत्राच्या आधारे पठाण यांना पोलीस स्टेशनला बोलविले व पैसे पठाण यांच्या ताब्यात दिले. त्याप्रसंगी ढमाळ यांनी रिक्षाचालक राजेंद्र गांगुर्डे यांचा सत्कार केला.