शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:46 IST

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : करपा, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव

इगतपुरी तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने सुरुवात चांगली केली असली तरी शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असताना शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. भातालाही कवडीमोल भाव असल्यामुळे दिवाळीतदेखील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भात पिकाचे करपा व तुडतुड्या या रोगाने नुकसान केले आहे. इगतपुरी तालुका कृषी विभागाच्यावतीने रोग गेलेल्या भात पिकावर पंचनामे करण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही. अशा अक्षम्य कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे.गत काही वर्षात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात भक्कम वाढ करणारी ठरलेली असताना भातास मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यास कर्जबाजारी करत आहे. खडीबरड एकर दीड एकर जमीन असलेला अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी भातशेती करण्यापेक्षा ती शेतजमीन विकून पोट भरण्याच्या मार्गाला लागलेला दिसून येत आहे. आजच्या दिवसात भातशेतीस लागवडीसह एकरी खर्च २० हजाराच्या पुढे गेला आहे तर मिळणारे उत्पन्न दहा ते पंधरा हजाराची मर्यादा ओलांडत नाही. सरासरी एकरी उत्पन्न १० क्विंटल आहे. किमान भाव २००० रुपये मिळाल्यास एकूण उत्पन्न २०००० रुपये व खर्च २५००० असा तोट्याचा धंदा झाला आहे.भात पिकास येणारा खर्च याप्रमाणे आहेबियाणे - २००० रुपयेमशागत - ३००० रुपयेखते - ५०० ते २००० रुपयेलावणीची मजुरी - १०००० रुपयेनिंदण मजुरी - ३००० रुपयेसोंगणी व इतर - ५००० रुपयेएकूण २५००० रुपये आणि एकरी उत्पन्न २० हजार.यावर्षी सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडण्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. इगतपुरी कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले, तेच समजलं नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भात पिके वाचवली असताना इगतपुरी कृषी विभागाने पंचनामे केले नाही.- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटना

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी