पांढराटाका रोगाने भात उत्पादक चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:53 IST2020-10-02T23:16:00+5:302020-10-03T00:53:51+5:30
वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणते औषध फवारावे याबाबत मार्गदर्शन केले.

तुडतुड्याने पांढरा टाका करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेताची पहाणी करताना इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी.आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे. समवेत शेतकरी.
वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणते औषध फवारावे याबाबत मार्गदर्शन केले.
वाडीवºहे येथील निवृत्ती कातोरे, नंदु राऊत आणि परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या भात पिकावर पांढरा टाका व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रादुर्भाव झालेल्या शेताला कृषि पर्यवेक्षक अकोले आणि अधिकाºयांनी भेट देऊन तपकीरी तुडतुड्याने हा रोग होत असल्याची माहिती दिली. उष्ण व दमट वातावरणात त्याची वाढ झपाट्याने होते. त्यावर अँसीफेट एकीरा हे किटक नाशक फवारावे. चार,पाच दिवसात रोग आटोक्यात आला नाही तर क्युनोल फाँस या किटक नाशकाची फवारणी करावी. करपा रोगावर मँकोझन काँपर आँक्झीक्लोराइड किटक नाशकाची फवारणी करावी. काळजी पुर्वक फवारणी कल्यास रोगावर नियंत्रण मिळविता येते.
शेतकºयांना मार्गदर्शन
रोगास सुरवात झाल्यावर युरीया खत भात पिकास देऊ नये. युरीया मुळे भात पिक हिरवेगार होते. हिरव्या पानातील हरित द्रव्य हे किटकांचे आवडते खाद्य असल्याने कीटकाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन रोग झपाट्याने वाढतो. काही शेतात तुरंब्या दिसतात. किटक भाताच्या खोडातच वास्तव्य करून भात दाण्यात अन्नरस जाऊ देत नसल्याने भाताचे दाणे पोकळ होतात. त्यामुळे तांदूळ तयार होत नसल्याचीही माहिती यावेळी शेतकºयांना देण्यात आली.