शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रहाड संस्कृती; नाशिकची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:30 IST

महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसºया दिवशी धुळवडला रंग खेळळा जातो. मात्र, नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे.

नाशिक : महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसºया दिवशी धुळवडला रंग खेळळा जातो. मात्र, नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. मंगळवारी (दि.६) होणाºया रंगोत्सवासाठी या इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्या असून, नाशिक-करांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. ४दर वर्षी होळीच्या दुसºया दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. ४रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते.  या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक, तांबट अळी, जुनी तांबट आळी आणि मधली होळी अशा सहा रहाडी असून, यंदा सहाही रहाडी उघडण्यात आल्या आहेत. नाशिककरांना त्यामुळे मनसोक्त रंगपंचमी खेळता येणार आहे. शनी चौकातील रहाडीची व्यवस्था सरदार रास्ते तालीम संघाकडे असून, त्याच्या पूजेचा मान दीक्षित घराण्याकडे आहे. दिल्ली दरवाजा येथील रहाडीचा मान सोमनाथ बेळे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे आहे.  साधारणपणे २५ बाय २५ फुटाचे ८ फूट खोलीचे दगडी हौद (पेशवे कालीन) नाशकात खोदलेले आहेत. शनिचौक पंचवटी (गुलाबी रंगाची) मानकरी सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, गाडगे महाराज पुलाजवळ (पिवळा रंग) रोकडोबा तालीम संघ, मधळी होळी तालमी जवळ, (केशरी नारंगी) असे याचे वैशिष्ट आहे. या रहाडीतील रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही. हजारो मंडळी यात उड्या मारून अंधोळ करतात. उडी मारण्याच्या एक पद्धतीला ‘धप्पा’ मारला असे मजेदार नाव आहे. धप्पा मारल्यावर किमान २० ते २५ माणसांच्या अंगावर रंगाचे पाणी उडालेच म्हणून समजा. उत्तम उडी मारणाराच धप्प्यात तरबेज होतो. रहाड म्हणजे पूर्वी गल्लीतील तालमीच्या पहेलवान मंडळींच्या गटा तटांची शक्ती प्रदर्शनाची जागा मानली जायची. रंगपंचमीच्या दिवशी पक्का नाशिककर राहाडीवर जाऊन येतोच.दुष्काळात संवेदनशीलता जपत रहाडी राहतात बंदपाऊस कमी पडल्यास व पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास यापैकी काही रहाडी बंद ठेवण्याचे भानही बाळगले जाते. याआधीही महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रहाड उघडण्याची परंपरा खंडित केली होती. लोकही वस्तूस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास सहकार्य करतात.