मालेगावी नगरसेवकावर रिव्हॉल्वरने हल्ल्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:54 IST2020-01-10T15:54:25+5:302020-01-10T15:54:41+5:30
मालेगाव मध्य : महापालिकेचे नगरसेवक मोहंम्मद आमीन मोहम्मद फारु ख यांच्यावर अज्ञात व्यक्तीने रिव्हॉलवरने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

मालेगावी नगरसेवकावर रिव्हॉल्वरने हल्ल्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले !
मालेगाव मध्य : महापालिकेचे नगरसेवक मोहंम्मद आमीन मोहम्मद फारु ख यांच्यावर अज्ञात व्यक्तीने रिव्हॉलवरने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुदैवाने ते हल्ल्यातुन थोडक्यात बचावले.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले,पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.हल्लेखोराचा पाठलाग करण्यात आला परंतु पळून जाण्यात यशस्वी झाला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल,स्थायी समिती सभापती डॉ.खालीद परवेज, नगरसेवक एजाज बेग, मुस्तिकम डिग्निटी, नबी अहमद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात उप अधीक्षक रत्नाकर नवले यांची भेट घेऊन हल्लेखोरास त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.