भारती पवार यांच्याकडून पेठ तालुक्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:44 IST2020-04-15T22:44:13+5:302020-04-15T22:44:45+5:30
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्यातील आरोग्यासह आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. मोफत वाटप करावयाचा तांदूळ लवकर वितरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भारती पवार यांनी पेठ येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पेठ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्यातील आरोग्यासह आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. मोफत वाटप करावयाचा तांदूळ लवकर वितरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पेठ येथील भेटीदरम्यान घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने गरजूपर्यंत रेशन पोहोचले की नाही, शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये अर्थसहाय्य तसेच जनधन खातेधारकांना त्यांचे खात्यात पाचशे रुपये अर्थसहाय्य, विधवा पेन्शन लाभ मिळाला का? यासह आरोग्य यंत्रणा कितपत सुसज्ज आहे व काय अडचणी आहेत याचीही माहिती खासदार डॉ. पवार यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत घेतली. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, व्यवस्थापक अजय पवार, वैद्यकीय अधिकारी पेठ, ग्रामविस्तार अधिकारी नंदू गायकवाड, डॉ. चोरडे, संजय वाघ, त्र्यंबक कामडी, विजय देशमुख आदींसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.