येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:04 IST2019-01-23T13:04:25+5:302019-01-23T13:04:42+5:30

येवला : तालुका कॉँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार चेल्ला वासीमचंद रेड्डी होते.

 Review meeting of Yeola Taluka Congress Committee | येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक

येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक

येवला : तालुका कॉँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार चेल्ला वासीमचंद रेड्डी होते. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रेड्डी यांनी तालुका कॉँग्रेस कमिटीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी चर्चा करून बूथ कमिट्या सक्षम करा, सभासद नोंदणी करा, जनसंपर्क अभियानाव्दारे गावागावात जाऊन जनतेला कॉँग्रेसच्या योगदानाची व विकसित दृष्टिकोनाची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले. खोटे बोलणारे व फसवे सरकार उलथून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, युवक कॉँग्रेस अध्यक्ष मंगलसिंग परदेशी, तालुका कार्याध्यक्ष संदीप मोरे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अनिल खैरे, फारु क चामडेवाला, इकबाल पटेल, नंदकुमार शिंदे, राजेंद्र गणोरे, रावसाहेब लासुरे, उस्मान शेख, शिवाजी धनगे, आशा झाल्टे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले.
 

Web Title:  Review meeting of Yeola Taluka Congress Committee

टॅग्स :Nashikनाशिक