शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:14 IST

नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांसह राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयांनी शेतकºयांप्रति सहकार्याची भूमिका ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी केले.

निफाड : नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांसह राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयांनी शेतकºयांप्रति सहकार्याची भूमिका ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी केले. निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सुलभ पीककर्ज वितरण अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, निफाडचे प्रांत महेश पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक भरत बर्वे, निफाडचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, कृषी अधिकारी बी. पाटील, लेखापरीक्षक संजय लोळगे उपस्थित होते. प्रास्ताविक निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी केली आहे. शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात सुलभ पीककर्ज वितरण अभियान सुरू करण्यात आले आहे. निफाड तालुका या अभियानात अग्रेसर असून, आतापर्यंत तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून जवळपास ९१ कोटी रु पयांचे पीक कर्ज वितरण करून ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतचे खरीप व रब्बी हंगामातील उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निफाड तालुक्यात ४६९८ कर्जापासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यातील ८१२ शेतकºयांचे कर्ज मागणी प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकेकडे जमा केले आहेत.त्यातील ७२२ शेतकºयांचे पीककर्ज मागणी प्रस्ताव बँकानी मंजूर केले आहेत. या आढावा बैठकीस निफाड तालुक्यातील विविध बँकेचे अधिकारी, महासूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्व कृषी सहाय्यक सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते. सूत्रसंचलन जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी भाऊसाहेब गांगुर्डे यांनी केले, तर आभार तहसीलदार दीपक पाटील यांनी मानले.निफाड तालुक्यातील कर्जापासून वंचित शेतकºयांना खरीप हंगामातील खरीप पीक मिळण्यासाठी तालुक्यातील सहकार, महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागात काम करणाºया सर्व अधिकाºयांनी आपली इतर कामे करून शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य करायचे आहे. कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची तक्र ार येता कामा नये.- महेश पाटील, प्रांताधिकारी, निफाड

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय