शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 2:50 PM

मानव-बिबट संघर्ष उफाळून येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात त्यांची काही सुचनाही केल्या.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणारभुजबळ यांनी फुले यांच्याशी संपर्क करत परिस्थिती जाणून घेतली.

नाशिक : इंदिरानगरच्या घटनेत दोघा इसमांना बिबट्याने जखमी केले, सुुदैवाने जीवीतहानी टळली. यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी संवाद साधत बिबट्याचा लोकवस्तीत वावर रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार याबाबत चर्चा केली.बिबट्यांचा वावर शहराच्या थेट लोकवस्तीपर्यंत होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरणे सहाजिकच आहे. इंदिरानगरला शनिवारी झालेल्या बिबट हल्ल्याच्या घटनेनंतर भुजबळ यांनी फुले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करत परिस्थिती जाणून घेतली. मानव-बिबट संघर्ष उफाळून येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात त्यांची काही सुचनाही केल्या. दरम्यान, दुपारी गोडसे यांनी फुले यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. हिंगणवेढे, दोनवाडे गावात बिबट हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या घटनांपासून इंदिरानगरच्या घटनेपर्यंत सगळ्याच मुद्यांवर गोडसे यांनी चर्चा करत बिबट-मानव संघर्ष जिल्ह्यात कसा टाळता येऊ शकेल? यासाठी केंद्र सरकारकडून कशी मदत घेऊन कसा तोडगा काढता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.दरम्यान, रात्री गोविंदनगर, कर्मयोगीनगर, पांगरे मळा या भागात बिबट्या संचाराची आवई उठली. यानंतर पुन्हा भुजबळ यांनी फुले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून याबाबत सत्यता जाणून घेत या भागात गस्त करण्याची सुचना केली. यानुसार वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, दक्षता पथकाचे एम.बी.पाटील यांनी वनरक्षकांसमवेत परिसरात गस्त करून बिबट संचाराबाबत खात्री करण्याचा प्रयत्न केला; मात्र या भागात बिबट वावरचा कुठल्याही संशयास्पद बाबी आढळून न आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव