प्रशासन अधिकार्यांनी घेतला शैक्षणिक कामाचा आढावा
By Admin | Updated: May 9, 2014 23:45 IST2014-05-09T22:48:14+5:302014-05-09T23:45:32+5:30
टाकळी : गेल्या शैक्षणिक वर्षात शाळांनी केलेले कामकाज, राबविलेले उपक्रम आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत प्रशासन अधिकार्यांनी मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केेले. शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम आणि वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्याकांनी दक्ष राहाण्याच्या सूचना यावेळी प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी दिल्या.

प्रशासन अधिकार्यांनी घेतला शैक्षणिक कामाचा आढावा
टाकळी : गेल्या शैक्षणिक वर्षात शाळांनी केलेले कामकाज, राबविलेले उपक्रम आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत प्रशासन अधिकार्यांनी मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केेले. शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम आणि वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्याकांनी दक्ष राहाण्याच्या सूचना यावेळी प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी दिल्या.
पलुस्कर सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पालिकेच्या १२७ शाळांमधील मुख्याध्यापक उपस्थित होते. ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांनी योगासने, एकच ध्यास, स्वच्छता, कार्यानुभव, छंदवर्ग, कराटे, वारली, रांगोळी, श्रमदान, मेहंदी, चित्र रंगविणे आदि उपक्रम कसे राबविले याची माहिती यावेळी प्रशासन अधिकार्यांनी घेतली. यावेळी काही शाळांनी राबविलेल्या उपक्रमाचे पॉवर प्रेझेंटेशन करून माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचेही दाखवून दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना कुंवर म्हणाल्या की, समाजासमोर शाळेचे चांगले चित्र निर्माण केले पाहिजे. त्यासाठी चांगल्या उपक्रमाची आणि कार्यक्रमाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचप्रमाणे ई-लर्निंगचा वापर महपालिकांच्या शाळेत होत असल्याची माहितीही समाजापर्यंत पोहचविण्याचे काम मुख्याध्यापकांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
शाळांना देण्यात आलेल्या संगणक व प्रोजेक्टरच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अपेक्षित असून त्याबाबचे परिपत्रक संकेतस्थळावर असल्याचे यावेळी मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. मध्यान्ह भोजन उपक्रम राबविताना काळजी घ्यावी, तांदूळ योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवाव, खिचडी आगोदर तपासली जावी अशा सूचना यावेळी महापलिकेच्या वतीने देण्यात आल्या. (वार्ताहर)
पटनेांदणी अभियान
मनपा शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी १ ते ७ मे दरम्यान राबविलेल्या पटनोंदणीची माहिती यावेळी घेण्यात आली. घरोघरी गेल्यानंतर शिक्षकांना आलेला अनुभव काही शिक्षकांनी कथन केला. त्यातून काही विदारक बाबीही समोर आल्या. विद्यार्थी कुठून आला, कसा आला याची माहिती शिक्षकांना होत असल्याने त्याच्यासाठी काय करावे हे जवळून समजल्याचे काही शिक्षकांनी बोलून दाखविले. शाळाबा विद्यार्थी शाळेच्या परिसरात आढळून आला तर त्याची जबाबदारी संबंधित शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांनी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.