शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पुनर्भेट :आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 16:17 IST

नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला.

ठळक मुद्देवनविभाग वन्यजीवप्रेमींचा प्रयोग यशस्वी...अन मातेचे ममत्व झळकलेनागरिकांना वनविभागाकडून खबरदारीच्या सुचना

नाशिक : निफाड तालुक्यातील वडाळीनजीक गावात असलेल्या एका शेतात बेवारसपणे आढळून आलेल्या तीन महिन्यांचा बछडा मातेपासून दुरावला होता. शेतकऱ्यांनी वनविभागाला माहितील दिल्यानंतर येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.१) संध्याकाळी या बछड्याची त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा प्रयोग करण्यात आला असता मादी पुन्हा येत त्या बछड्यालासोबत घेऊन गेली.

त्यानंतर नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला. एका स्टीलच्या जाळीखाली बछड्याला सुरक्षितरित्या झाकून ठेवण्यात आले आणि संपुर्ण परिसर निर्मनुष्य केला. जाळीला लांब दोरी बांधून ठेवण्यात आली. यावेळी ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी ३६०अंशात फिरणारा डिजीटल कॅमेरा त्यादिशेने बसविला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातून बाहेर येत मादीने दर्शन दिले. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. वडाळीनजीक गावात बिबट्याचा बछड्यांसह वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील सर्व नागरिकांना व शेतमजुरांना सतर्क राहत खबरदारीच्या सुचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.-...अन मातेचे ममत्व झळकलेमादीने कॅरेटजवळ जाऊन हुंगण्यास सुरुवात केल्यानंतर लांब अंतरावर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी जाळीला बांधलेली दोरी अलगद ओढत जाळी उंचविली. यावेळी बछड्याने बाहेर येऊन मातेला चाटण्याचा प्रयत्न केला; मात्र मादी पुन्हा तेथून शेतात निघून गेली आणि काही मिनिटांत माघारी फिरली आणि पुन्हा जाळीजवळ आली असता जाळी तत्काळ ओढण्यात आल्याने बछडा वेगाने बाहेर पडला. यावेळी मातेने त्याच्या तोंडाला चाटत त्याला जबड्यात धरत पुन्हा शेत गाठले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव