नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:14 IST2020-07-29T18:13:43+5:302020-07-29T18:14:12+5:30
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के लागला.

नगरसुल विद्यालयात शालांत परीक्षेत प्रथम क्र मांक पटकावणाऱ्या वैष्णवी निकमला पेढा भरविता तीची आई कल्पना. समवेत शिक्षीका अनिता हाडके व वडील निलेश निकम.
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के लागला.
या शाळेतील मुलींनीच प्रथम व द्वितीय क्र मांकावर येण्याची परंपरा कायम ठेवत बाजी मारली. २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, यापैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम आलेली वैष्णवी निलेश निकम ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडके वस्ती शाळेची विद्यार्थिनी आहे.
विद्यालयातील प्रथम क्र मांक - वैष्णवी निलेश निकम, धनश्री राजेंद्र सोनवणे (९१.६०), द्वितीय क्र मांक - स्नेहल अंबर परदेशी (९१.४०), तृतीय क्र मांक - ज्ञानेश्वर अशोक पालवे (९०.४०), चतुर्थ क्र मांक - ऋतुजा योगेश खैरनार (९०.००), पाचवा क्र मांक अनुष्का सुधीर निकम (८९.८०) सहावा क्र मांक वैष्णवी श्रीहरी पैठणकर (८९.४०). याप्रमाणे यश संपादन केले.