शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सायंकाळी सात वाजेनंतर निर्बंध ! सायंकाळपासून पहाटे ५ पर्यंत कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 19:16 IST

कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देनाशकात सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

नाशिक : कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी ७ नंतर जे नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील बाधित आणि बळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांबरोबरच मध्यमवयीन गटातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, त्यामुळेच नाशिक शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सायंकाळी ७ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाºयांवर पोलीस कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळSuraj Mandhareसुरज मांढरेRadhakrishna Gameराधाकृष्ण गमेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील