शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 05:35 IST

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो.

संजय दुबबळेनाशिक : कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तर राज्यातील निर्बंधांमुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत.  यावर्षी जिल्ह्यातून केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. कांद्यालाही कोरोनाचा फटका बसला.

आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा दरात काहीशी सुधारणा होऊन उन्हाळ कांदा सरासरी १,३२० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १,१८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. मुंबईत काही भागात रस्त्यावर बसून भाजी विक्री करू दिली जात नसल्याने व्यापारी मालाची खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. 

टेबल आणि वाईन दोन्हीही द्राक्षांना फटका

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी विदेशातून होणारी द्राक्षांची मागणी घटली. त्यातच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीला देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला. त्यातही द्राक्षाला खूप चांगला दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले; पण तेथेही दर कोसळल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल झाला नाही. याउलट वाईन द्राक्षांना भाव मिळाला; पण वायनरी चालकांकडून अपेक्षित खरेदी झाली नाही.

केळीच्या व्यापारात घट

-अजय पाटीलजळगाव :  जिल्ह्यातील केळीच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १,४०० रुपयांपर्यंत असले तरी व्यापारी केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केळी पाठविली जाते. सद्य:स्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन माल बाहेर पाठविला जातो. मात्र, यंदा त्यात काही प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळत आहे. व्यापारी माल काढण्यासाठी वेळेवर येत नाहीत. 

टरबूज शेतातच- गणेश आहेरअहमदनगर : कोरोनाच्या सावटाने बाजारपेठा बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच पडून आहे. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते; परंतु मागील वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबूज उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टरबूज पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. बी-बियाण्यापासून कीड लागू नये म्हणून अनेक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या