शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

शाळांवर सुरक्षितता ठेवण्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:23 IST

सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वैचारिकता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळांची

नाशिक : सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वैचारिकता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळांची असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. सागर देशपांडे यांनी केले. मात्र सध्या काम करणाºया माणसांपेक्षा काम करू न देणाºया माणसांची संख्याच अधिक झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.महाराष्टÑ समाज सेवा संघ, नाशिक संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात ‘शिक्षण-गुरुक्षेत्र की कुरुक्षेत्र’ विषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ. सागर देशपांडे म्हणाले की, सद्याच्या काळात शैक्षणिक संस्थांची तसेच शाळांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी, कोषाध्यक्ष निरंजन ओक, मिलिंद चिंधडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.मुख्याध्यापक संगीता टाकळकर यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, संस्थेच्या वाघेरे आश्रमशाळेचा एव्हरेस्ट सर करणारा विद्यार्थी मनोहर हिलिंग याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रज्ञा कुलकर्णी केले. तर आभार शीतल पवार यांनी मानले.डॉ. सागर देशपांडे म्हणाले, शाळांमध्ये सैनिकी शिक्षण मिळणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये हे शिक्षण सक्तीचे करण्यात आले असून, काळाची पावले ओळखून रचना विद्यालयानेही या दिशेने टाकलेले पाऊल उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक