त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:45 IST2019-03-18T01:44:58+5:302019-03-18T01:45:16+5:30

पुणे येथील पोट्रेट आर्टिस्ट जगदीश चाफेकर यांच्या त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़

Response to Triveni Portrait Exhibition | त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला प्रतिसाद

त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला प्रतिसाद

नाशिक : पुणे येथील पोट्रेट आर्टिस्ट जगदीश चाफेकर यांच्या त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ कुसुमाग्रज स्मारकात या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री विद्या करंजीकर यांच्या हस्ते झाले़
यावेळी ज्येष्ठ अभिनेते आनंद बापट, उद्योजक अरुण आपटे, चित्रकार जगदीश चाफेकर, सुनील देव, विद्या आपटे, चित्रकार नारायण चुंबळे, विठ्ठल देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘त्रिवेणी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले़ प्रदर्शनात ३५ तैलचित्रांची मांडणी करण्यात आली आहे़ यात जुन्या व नव्या पिढीतील नामवंत व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. चाफेकर यांनी १९९३ पासून विविध ठिकाणी प्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली आहे़
चाफेकर यांचे जुलै २०१९ मध्ये अमेरिकेत डलास, बोस्टन आदी ठिकाणी ‘झेप’ हे प्रदर्शन होणार आहे. सुनीला देव यांनी स्वागत केले. प्रमुख अतिथी विद्या करंजीकर यांनी प्रदर्शन पाहून शुभेच्छा दिल्या.

Web Title: Response to Triveni Portrait Exhibition