शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कडाक्याच्या थंडीतही योगाथॉनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:25 IST

कडाक्याची थंडी असतानाही सूर्यदेवतेच्या नामस्मरणाने एकामागोमाग एक घालण्यात आलेल्या सूर्यनमस्काराच्या निमित्ताने सूर्याच्या उपासनेबरोबरच आरोग्याबाबतची सजगता जाणवली ती योगाथॉन- २०१९च्या अनोख्या उपक्रमात. शहरातील तब्बल सातशे मुली-महिलांच्या सहभागातून या उपक्रमाला प्रतिसाद लाभलाच शिवाय त्यातील ६३० सहभागी सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करत सुवर्णपदकही पटकावले.

ठळक मुद्देसूर्योपासना : सहाशे जणांनी पटकावले सुवर्णपदक; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

नाशिक : कडाक्याची थंडी असतानाही सूर्यदेवतेच्या नामस्मरणाने एकामागोमाग एक घालण्यात आलेल्या सूर्यनमस्काराच्या निमित्ताने सूर्याच्या उपासनेबरोबरच आरोग्याबाबतची सजगता जाणवली ती योगाथॉन- २०१९च्या अनोख्या उपक्रमात. शहरातील तब्बल सातशे मुली-महिलांच्या सहभागातून या उपक्रमाला प्रतिसाद लाभलाच शिवाय त्यातील ६३० सहभागी सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करत सुवर्णपदकही पटकावले.श्री. डी. एम. पगार हेल्थ अ‍ॅन्ड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गंगापूररोड येथे रविवारी (दि. १०) योगाथॉनचा उपक्र म पार पडला. त्यानंतर पूरक व्याख्यान व नंतर सलग बारा सूर्यनमस्कारांचे एक अशी नऊ आवर्तने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सहायक पोलीस आयुक्त माधुरी कांगणे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा, रोहिणी नाईक, उपक्र माच्या सदिच्छादूत डॉ. नमिता कोहोक उपस्थित होते. १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर शेवटच्या सत्रात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सूर्यनमस्कारांतून हृदयाशी संबंधित सर्व आजार दूर राहत असल्याचे दाखले दिले आहेत. त्यामुळे हा उपक्र म म्हणजे थेट हृदयाशी नातं सांगणारा असल्याचेही सांगितले.आयोजिका डॉ. स्वाती पगार यांनी योगाथॉन व सूर्यनमस्कारामागील शास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या माहिती दिली. तर आयोजिका डॉ. प्रणिता गुजराथी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जयश्री सूर्यवंशी, संदीप चिंचोलीकर, ललित जाधव, व्यंकटेश पाटील, अनिल निकम, मनीष हिरे, दीपक पाटील, भूषण वाणी, शीतल जाधव, श्रद्धा राठोड, सरोज निकम, शुभदा जगदाळे, तृप्ती वाणी, कविशा पाटील, श्वेता देशपांडे, डॉ. मनीष पवार, चतुर नेरे आदी उपस्थित होते.स्वानंदी वालझाडे या विद्यार्थिनीने रिदमिक योगासनांचे सादरीकरण केले. त्यानंतर स्वयम पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या जलतरणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. एस.डी.एम.पी. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी प्रास्ताविकात नाशिककरांच्या आरोग्यासाठीचा हा योगयज्ञ असल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोग