‘दृष्टिकोन’ छायाचित्र प्रदर्शनास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:50 IST2018-10-20T00:50:05+5:302018-10-20T00:50:34+5:30
‘डी-टूर’ उपक्रमांतर्गत वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने यांनी ‘दृष्टिकोन’ या छायाचित्रांचे. तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. कॅनडा कॉर्नरवरील भानूप्रसाद अपार्टमेंटमधील कार्यालयात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास कलारसिकांचा प्रतिसाद लाभला.

‘दृष्टिकोन’ छायाचित्र प्रदर्शनास प्रतिसाद
नाशिक : ‘डी-टूर’ उपक्रमांतर्गत वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने यांनी ‘दृष्टिकोन’ या छायाचित्रांचे. तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. कॅनडा कॉर्नरवरील भानूप्रसाद अपार्टमेंटमधील कार्यालयात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास कलारसिकांचा प्रतिसाद लाभला. एकापेक्षा एक सरस वन्यजीव व पक्ष्यांची विविध छायाचित्रांची सफर ‘दृष्टिकोन’मधून घडत आहे.‘सोनम’चा पिलांसोबतचा ताडोबामधील फेरफटका, ‘काबिनी’मध्ये बिबट्याची रुबाबदार बैठक, ‘बोर’चे वैशिष्ट्यं सांगणारा जंगली कुत्र्यांच्या समूह, आशियाई हत्तींची लक्षवेधी चाल, नांदूरमधमेश्वरचा लाल मुनिया, तसेच गंगापूर बॅकवॉटरमधील कोतवालाची डुबकी अशा अनेक चित्रांचे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती गोवर्धने यांनी दिली.
कर्नाटकमधील ‘काबिनी’, जिम कार्बेट, ताडोबा अभयारण्य, बोर, भरतपूर अशा विविध अभयारण्यांत टिपलेली छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सुमारे ४० छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली असून, यामध्ये २७ छायाचित्रे विविध वन्यजिवांची टिपलेली आहेत, तर उर्वरित छायाचित्रे पारंपरिक सण, उत्सव, परंपरेची कथा सांगणारे आहेत.