गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:51 IST2020-02-12T22:46:15+5:302020-02-12T23:51:03+5:30

लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Respect for quality students | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देवपूर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अण्णासाहेब गडाख, दौलत मोगल, विजय गडाख, अभिषेक गडाख, अण्णासाहेब पाटील, संजय जाधव, रामेश्वर मोगल यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी.

सिन्नर : लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
व्यासपीठावर उपाध्यक्ष दौलतराव मोगल, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, संस्थेचे व्यवस्थापक अभिषेक गडाख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मुख्याध्यापक संजय जाधव, रामेश्वर मोगल उपस्थित होते. युरोप येथे आयोजित राफलिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या पूजा गडाख व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तम कामगिरी करणारा अमित गडाख या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सोपान गडाख यांनी केले. आभार सुनील पगार यांनी मानले.

Web Title: Respect for quality students