शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

अभियांत्रिकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:39 AM

देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देगुणगौरव : इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट नाशिक सेंटरतर्फे अभियंता दिन उत्साहात

नाशिक : देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला.दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स इंडियाच्या नाशिक लोकल सेंटतर्फे संस्थेच्या अशोका सभागृहात रविवारी (दि.१५) अभियांत्रिकी विद्याशाखेतील गुणवंंत विद्यार्थ्यांचा महिंद्र्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, अशोका ग्रुपचे अध्यक्ष तथा नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. उपस्थित नाशिक लोकल सेंटरचे अध्यक्ष संतोश मुथा, मानद सचिव अजित पाटील, सहसचिव ़विपूल मेहता, श्रीकांत बच्छाव हे व्यासपीठावर होते़ उपस्थित मान्यवरांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन करतानाच नवनवीन संशोधनांचा ध्यास घेत समाज जीवन सुखकर करण्यासाठी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला. यावेळी नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, नरेंद्र बिरार, टी़ एऩ अग्रवाल, सुमित खिंवसरा, राजकुमार सिरसम, संजय देशपांडे, गिरीश पगारे, विलास पाटील, धिरज पिचा, दिनकर बोडके, सहस्त्ररष्मी पुंड, नयनिश जोशी, संजय दीक्षित, अशोक डोंगरे, डी़ बी. गोरे आदी विविध क्षेत्रांत कार्यरत अभियंते उपस्थित होते.यांचा झाला गौरवनाशिक विभागातील विविध महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यात दुर्गेश थोरात, मयुर आहिरे, रुतुजा निकूम, दिव्या मस्के, वैशाली जमदाडे, श्रावनी चव्हानके, शुभम वाबळे, जुही भुरे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक, अक्षय गांगुर्डे, प्रिया सोनवणे, स्नेहल वाघ, भैरवी पवार, प्रियंका चांदोरे, अभिषेक जाधव, लोकेश अतारडे, श्रेयष गायनार आदी विद्यार्थांचा समावेश होता.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी