शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

स्टेडियमच्या जागेत भुयारी वाहनतळाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:37 AM

छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला. या मैदानाचा वापर केवळ खेळासाठी व्हावा, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केलेले असल्याने वाहनतळाच्या प्रस्तावाला कायदेशीर मार्गाने विरोध करण्याची तयारीही समितीने बैठकीत दाखविली आहे.

नाशिक : छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला.या मैदानाचा वापर केवळ खेळासाठी व्हावा, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केलेले असल्याने वाहनतळाच्या प्रस्तावाला कायदेशीर मार्गाने विरोध करण्याची तयारीही समितीने बैठकीत दाखविली आहे. त्यासाठी स्टेडियम बचाव समितीतर्फे बुधवारी (दि. २५) महापौर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  या मैदानाची मालकी जिल्हा परिषदेची असून, जिल्हा क्र ीडा संकुल समितीला सामंजस्य कराराद्वारे ताब्यात दिलेली आहे. जिल्हा क्र ीडा संकुल समितीतर्फे मैदानावर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, ज्युडो, तलवारबाजी, कॅरम, धनुर्विद्या, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल आदी क्र ीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा वापर करीत खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाशिकची मान उंचावत असताना येथे वाहनतळ उभारण्याच्या निर्णयामुळे नाशिकची क्रीडा परंपरा धोक्यात येण्याची भीतीही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. याबैठकीला मंदार देशमुख, आनंद खरे, अविनाश खैरनार, रमेश भोसले, रवि मेतकर, प्रशांत भाबड, राजे शिंदे, उमेश आटवणे, सचिन निरंतर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका