शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या

By admin | Updated: August 5, 2014 01:53 IST

रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या

 

नाशिक : जुन्या नाशकातील काझी गढीच्या धोकेदायक काठालगतच्या दोनशे कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार असून, गढीचा भुसभुशीत झालेला भाग ढासळत चालला आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवासी संतप्त झाले असून, आज सकाळी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.धोकेदायक झालेल्या काझी गढीचा काही भाग गेल्या सहा दिवसांपूर्वी कोसळल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून स्थलांतर करण्याचा तगादा लावला जात असून, काठालगतच्या कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेकडून कमी घरे दिली जात असून, जुन्या घरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही लेखी हमी मनपा देण्यास तयार नसून गढीला संरक्षक भिंत बांधून देण्याबाबतही प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे स्थलांतर करून आमच्यावर बेघर होण्याची वेळ येईल; त्यापेक्षा मृत्यू परवडला, अशा भावना येथील महिलांनी बोलून दाखविल्या. दरम्यान, गेल्या रविवारप्रमाणे आजदेखील येथील काझी गढी रहिवाशांनी धोकेदायक झालेल्या गढीच्या काठावरच सकाळपासून भर पावसात ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आजदेखील महापौर किंवा अन्य अधिकारी गढीवर फिरकले नसल्यामुळे मनपा प्रशासन आम्हा रहिवाशांची मृत्यूच्या दरीत जाण्याची वाट बघत आहे, त्यांना येथील रहिवाशांच्या जिवाची पर्वा नाही, असा गंभीर आरोप सुरेश कुमावत, कैलास काथवटे, दशरथ कदम, पंकज रहाणे, संजय शिंदे, चंद्रकला नागपुरे, वैशाली खोडके, सुलोचना वारे, रंजना काथवटे, संगीता जाधव यांच्यासह इतर महिलांनी केला आहे. (प्रतिनिधी)