रहिवाशांच्या माथी पायपिट
By Admin | Updated: August 7, 2015 00:37 IST2015-08-07T00:19:06+5:302015-08-07T00:37:47+5:30
बॅरेकेडिंगची डोकेदुखी : फेरबदलामुळे ‘शॉर्टकट’ बंद, ‘लॉँगकट’ खुले

रहिवाशांच्या माथी पायपिट
नाशिक : कुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून, पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आतापासूनच शहरातील विविध मार्गांवर चारचाकी वाहनांना बंदी, तर काही मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी रस्त्याचा मार्ग दाखविला जात आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी कारंजा, जुने नाशिक, हनुमानवाडी, रामवाडी या भागातील नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बॅरेकेडिंगमुळे स्थानिक रहिवाशांवर पायपिटीचे संकट ओढवले आहे.
स्वामी नारायण पोलीस चौकीजवळील वाहतूक कोंडी.