र्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:20 IST2018-11-28T23:48:26+5:302018-11-29T00:20:54+5:30
आर्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

र्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी
नाशिक : आर्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत अरविंद लभडे (४५, रा. घर नंबर ४०२, घनकर लेन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे घनकर लेनमधील आसरा बिल्डिंगमध्ये दुकान असून, तिथे त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी दुकानात असताना संशयित महेंद्र दळवी व त्याचे साथीदार दुकानात घुसले़ यानंतर पत्नीला शिवीगाळ करून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास गेम करण्याची धमकी देऊन गाळ्याचे शटर लावून कुलूप लावले़ दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी वळवी व त्यांच्या साथीदारांविरोधात खंडणी व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
सोनसाखळी चोरट्यास अटक
सोनसाखळी चोरी प्रकरणात फरारी असलेल्या चोरट्यास शिताफीने अटक करण्यात आली. जयभवानी रोडवर गेल्या २४ मार्चला तुळजाई बंगला येथे एका महिलेची सोनसाखळी मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बबलू रामधर यादव यास शिताफीने पकडले होते. मात्र दुसरा संशयित सागर सुरेश म्हस्के हा गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. पोलीस सोनसाखळी चोरटा म्हस्के याच्या मागावर होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेतील कर्मचारी विशाल पाटील यांना संशयित म्हस्के याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटील, डी. के. पवार, विशाल कुंवर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी जयभवानी रोड येथील पेट्रोलपंपाजवळ सोनसाखळी चोरटा म्हस्के यास अटक केली. नाशिकरोड न्यायालयासमोर म्हस्के याला उभे केले असता पोलीस कोठडी दिली आहे.