शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
3
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
4
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
5
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
6
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
7
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
8
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
9
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
10
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
11
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
12
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
13
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
15
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
16
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
17
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
18
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
19
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
20
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

शासनाच्या जागेवरील अतिक्र मण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:18 AM

आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवरील अतिक्र मण येथील रहिवाशांनी स्वत:हून काढून घेतल्याने संघर्ष टळला. या अतिक्र मणामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या बांधकामास अडथळा होत असल्याची तक्रार होती. कारवाईप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आडगाव : आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवरील अतिक्र मण येथील रहिवाशांनी स्वत:हून काढून घेतल्याने संघर्ष टळला. या अतिक्र मणामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या बांधकामास अडथळा होत असल्याची तक्रार होती. कारवाईप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून मोलमजुरी करणारी अनेक कुटुंबे पत्र्याची कच्ची घरे उभी करून वास्तव्य करीत होती. सदर जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयासाठी प्रस्तावित होती. कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी सदर घरांचा अडथळा असल्याने मंगळवारी (दि. २९) सकाळी १० वाजेच्या सुमारास माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात हजर झाले. सदर अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केल्यानंतर रहिवाशांनी स्वत:हून सर्व अतिक्रमण काढून घेतले. त्यानंतर उर्वरित छोटे-मोठे बांधकाम जेसीबीच्या मदतीने हटविण्यात आले. यावेळी सचिव आर. आर. मारवाडी, सहायक पोलीस उपआयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, मनपा अतिक्र मण निर्मूलन पथकाचे कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.लवकरच होणार कामाला सुरुवातमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. आडगाव येथे पाच ते सात एकर जागेवर इमारत साकारण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून दहावी, बारावी परीक्षा मंडळ भाडेतत्त्वावरील इमारतीत कार्यरत होते. मंडळाच्या हक्काच्या इमारतीसाठीही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मंडळाचे कार्यालय द्वारका चौकाजवळील वाणी हाउसमध्ये भाडेतत्त्वावर आहे. आडगाव येथील या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याने हे बांधकाम प्रलंबित होते. सदर बांधकाम मंगळवारी हटविण्यात आल्यानंतर बांधकामासाठी असलेला अडथळा दूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.अशा असणार सुविधानव्या इमारतीत पार्किंगसाठी मोठी जागा, मीटिंग हॉल, पेपर सेटिंग हॉल, मुख्याध्यापकांसाठी वेटिंग हॉल, मूल्यांकन स्टडी हॉल यांसह अद्ययावत सोयी-सुविधा व गार्डन अशा सुविधा असणार आहेत. या इमारतीत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचे कार्यालय सुरू होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा