दिंडोरी पंचायत समितीच्या तक्रारीबाबतच्या अहवालासाठी स्मरणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:39 IST2020-10-28T17:39:19+5:302020-10-28T17:39:52+5:30
वणी : दिंडोरी पंचायत समितीत अनियमितता होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांना विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी लेखी स्वरुपात स्मरणपत्र दिले आहे.

दिंडोरी पंचायत समितीच्या तक्रारीबाबतच्या अहवालासाठी स्मरणपत्र
वणी : दिंडोरी पंचायत समितीत अनियमितता होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांना विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी लेखी स्वरुपात स्मरणपत्र दिले आहे.
दिंडोरी पंचायत समितीअंतर्गत ११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता मनमानी करत दुसरीकडे कार्यरत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून त्यांचे वेतनही त्यास अनुसरून काढण्यात आले. तत्कालीन गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्या कार्यकाळापासून ते सध्या कार्यरत गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या विद्यमान कारकिर्दीतही ही बाब सुरू असल्याची माहिती उघड झाल्याने संघटितपणे सुरू असलेल्या अनियमिततेचे प्रकरण पुढे आले.
याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, विभागीय आयुक्त व संलग्न विभागाकडे तक्रारदाराने तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सखोल चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करण्याबाबत संबधितांना सुचित केले होते. आता वरिष्ठ पातळीवरूनही अहवालाबाबत प्रतीक्षा करण्यात येत असताना जिल्हा परिषदेकडून अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही अहवाल प्राप्त झालेला नाही.