शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
5
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
6
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
7
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
8
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
9
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
10
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
11
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
12
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
13
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
14
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
15
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
16
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
17
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
18
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
19
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
20
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

‘रेमडेसिविर’ चोरीचा काही तासांत पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 01:11 IST

काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा असाच एक प्रकार गंगापूररोडला उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयाच्या मदतनीस व वॉर्ड बॉयला पोलिसांनी रेमडेसिविर चोरीप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी ठोकल्या बेड्या : पीपीई किट परिधान करत दोघांचा प्रताप

नाशिक : काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा असाच एक प्रकार गंगापूररोडला उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयाच्या मदतनीस व वॉर्ड बॉयला पोलिसांनी रेमडेसिविर चोरीप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.गंगापूर रोडवरील एका रुग्णालयातून पीपीई किट्स घालून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांनाना गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रुग्णाच्या नावे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे काचेच्या सीलबंद बाटल्यांचे दोन बॉक्सही जप्त केले आहे. या  रेमडेसिविर चोरी कांडमध्ये रुग्णालयातील मदतनीस आणि वॉर्डबॉयचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.  पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी विकी वरखडे, मदतनीस सागर सुनील मुटेकर, वॉर्डबॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना शिताफीने अटक केली आहे.शनिवारी रात्री (दि.१७) रात्री पावणेदहा वाजता रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कोविड वॉर्डमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल झाला. त्यास रेमडेसिविर इंजेक्शनचा पहिला डोस देण्यासाठी दोन रेमडेसिविर इंजेक्शन नर्सिंग काऊंटरवर औषधांच्या बॉक्समध्ये ठेवले होते. त्याचवेळी अनोळखी दोघे इसम पीपीई किट्स घालून तिसऱ्या मजल्यावर आले. त्यातील एकाने कोरोना वॉर्डात प्रवेश करून काऊंटरवरच्या औषधांच्या बॉक्समधील रेमडेसिवीर इंजेक्शन हातोहात गायब केले. त्यांचा हा प्रताप रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.याप्रकरणी रुग्णालयाच्या महिला प्रशासन अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीची पाहणी करून पीपीई किट घालून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने चोरी केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी तपासाला गती दिली. सहायक निरीक्षक प्रवीण सुर्यवंशी यांच्या गुन्हे शोध पथकाने काही तासांत या चोरीचा पर्दाफाश केला. गोपनीय चौकशीतून या चोरीचा म्होरक्या विकी  असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्यासह रुगणलायच्या कर्मचाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या. चौकशीत त्याने दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेमडेसिवविर इंजेक्शन चोरी केल्याची कबुली दिली. कोरोनाचा फैलाव अन‌् रेमडेसिविरचे ‘ब्लॅक’ तेजीतएकीकडे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून प्रशासकीय यंत्रणा चिंतेत सापडली आहे तर दुसरीकडे रेमडेसिविरचा काळाबाजार शहरात तेजीत येऊ लागल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय पेशातील व्यक्तींकडून अशाप्रकारे कोरोना आजारात अनेकदा उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून स्पष्ट होते. गरजूंना इंजेक्शन मिळत नसून सर्वत्र तुटवडा भासू लागला आहे. १० हजार ८०० रुपयांचे इंजेक्शन जप्ततिघा चोरट्यांकडून पोलिसांनी १० हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शनच्या बाटल्यांचे दोन बॉक्स हस्तगत केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकtheftचोरी